सातव्या किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यात २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात करण्यात आले आहे. पुण्याबरोबरच ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्येही या महोत्सवातील उपक्रम होणार आहेत.
महोत्सवाचे अध्यक्ष विजय वर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संयोजक वीरेंद्र चित्राव, ‘पगमार्कस’ या संस्थेचे अनिरुद्ध चाओजी, ‘गो वाईल्ड’ चे संदीप देसाई आणि वनविभागाचे प्रसिद्धी अधिकारी व्ही. डी. सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.
‘जल संवर्धन, भविष्य रक्षण’ हा या वर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, दिल्ली आणि तामिळनाडू येथील एकूण २५ शहरांमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह आणि घोले रस्ता कलादालन येथे तर पिंपरी-चिंचवडमध्ये इंदिरा इन्स्टिटय़ूट कँपसमधील ध्रुव सभागृहात महोत्सव होईल.
या महोत्सवात विविध विषयांवरील चित्रपटांबरोबरच दृकश्राव्य व्याख्याने, परिषदा, खुली चर्चासत्रे, छायाचित्रण कार्यशाळा, माहितीपर भटकंती आणि स्पर्धाचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका आवश्यक असून निलायम टॉकीजजवळील ‘पाथफाईंडर’, लॉ कॉलेज रस्त्यावरील ‘लोकायत’ आणि पगमार्कस व गो वाईल्ड या संस्थांमध्ये या प्रवेशिका रसिकांना १३ जानेवारीपासून मोफत उपलब्ध होणार आहेत. तसेच ६६६.‘्र१’२‘ं१५ं२४ल्लिँं१ंऋी२३.्रल्ल या संकेतस्थळावरही महोत्सवाची नावनोंदणी करता येईल. या वर्षी छायाचित्र स्पर्धेसाठी ‘पाण्यासाठी दाही दिशा’ आणि ‘पर्यावरण माझ्या नजरेतून’ हे विषय देण्यात आले आहेत. छायाचित्र स्पर्धेविषयी अधिक माहिती ६६६.ॠ६्र’.िल्ली३.्रल्ल किंवा ६६६.स्र्४ॠें१‘२123.ूे या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Story img Loader