देशभरातून आलेल्या ९ हजार छायाचित्रांतून जितेंद्र अग्रवाल यांचे छायाचित्र निवडले गेले ते त्यातून पाणी वाचवाचा संदेश प्रभावीपणे मिळतो म्हणून, अशा स्पर्धामधूनच जनमानस पाण्याच्या वापराबाबत जागृत होईल असे मत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी व्यक्त केले.
किलरेस्कर वसुंधरा फौंडेशन यांनी वसुधरा महोत्सवानिमित्त राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या पाणी वाचवा या छायाचित्र स्पर्धेतील
प्रथम पुरस्कार मिळालेल्या अग्रवाल यांना पुण्यात एका विशेष कार्यक्रमात शिवराम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यावेळी गौरी किलरेस्कर, लोकायत च्या अलका जोशी, गो वाईल्ड चे संदीप देसाई, पग मार्कचे अनिल गुप्ते, ललित देशमुख, महोत्सवाचे अध्यक्ष विजय वर्मा, विरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते.

Story img Loader