कोपरगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे गटाला ४, आमदार अशोक काळे गटाला २, तर औताडे गटाने १ ग्रामपंचायतीत विजय मिळवला.
कोल्हे गटात ७ पैकी खोपडी, तळेगाव, मळे, धारणगाव, सोनेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय प्राप्त झाला, तर चांदेकसारे व करंजी या ग्रामपंचायती काळे गटाकडे गेल्या.बहादरपूर ही एकमेव ग्रामपंचायत औताडे गटाला मिळाली. या निवडणुकीच्या अगोदर करंजी गावची ग्रामपंचायत कोल्हे गटाकडे होती, तर धारणगाव काळे गटाकडे होती. निवडणुकीत मात्र दोन्ही गटाने एकमेकांकडे असलेल्या ग्रामपंचायती खेचून घेतल्या आहेत.
बहादरपूर (औताडे गट) विजयी उमेदवार – चांगदेव राहणे, बाबासाहेब राहणे व रोहिणी गाडेकर (बिनविरोध) बाबासाहेब पाडेकर, मीराबाई राहणे, संगीता खकाळे, श्रावण पाडेकर, मीनाक्षी राहणे (बिनविरोध), आशा राहणे.
चांदेकसारे – (काळे गट) मधुकर पवार, संगीता पगारे, रवींद्र खरात, जयद्रथ होन, मंदाकिनी होन, अशोक होन, कमळाबाई गोधडे, रोहिणी जगताप, संजय होन, उषा लांडगे, मीराबाई पवार, मतिन शेख, शशिकला कुमावत. अशा प्रकारे १३ विजयी उमेदवारात ११ उमेदवार काळे गटाचे तर कोल्हे गटाचे २ विजयी झाले.
धारणगावमध्ये ९ पैकी कोल्हे गटाला ८, तर काळे गटाला १ जागा मिळाली. विजयी उमेदवार दीपक चौधरी, सविता रणशुर, योगिता सुरे, रावसाहेब चौधरी, चंद्रकला गोलवड, अनिता चौधरी, रमेश घोडेराव, अरुण जिरे, अलका दबंगे यांचा समावेश आहे.
करंजीत ११ पैकी ८ जागा काळे गटाला व ३ जागा कोल्हे गटाला मिळाल्या. विजयी उमेदवार-  संजय आगवण, अलका आहेर, संतोष काजळे, चांगदेव कापसे, जिजाबाई लाडबोले, रमेश फापाळे, संगीता ढवळे, ऊर्मिला शिर्के, छबू डोखे, लताबाई डोखे, अलका करंजकर.
खोपडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७ पैकी ५ जागा कोल्हे गटाला तर २ जागा काळे गटाला मिळाल्या. सर्व विजयी उमेदवार – सुरेश जाधव, सुशीला नवले, पुंजाहरी वारकर, मंदाकिनी नवले, अनिता वारकर, जगन्नाथ भवर, मंदा पवार यांचा समावेश आहे.
सोनेवाडीत ९ पैकी काळे गटाला ५, परजणे गटाला ३, तर कोल्हे गटाला १ जागा मिळाली. तेथे मिनानाथ गुडघे, पुष्पा दहे, आबासाहेब वायसे, बापूसाहेब जावळे, संगीता जावळे, केशव जावळे, मीराबाई घोगडे, शोभा जाधव, गणपत राऊत, गोदाबाई रोकडे, अनिता जायपत्रे, कडूबाई माळी, मीराबाई तीसे विजयी झाले.
तळेगावला ७ पैकी ४ जागा कोल्हे गटाला, तर ३ जागा काळे गटाला प्राप्त झाल्या. विजयी उमेदवार – भानुदास वाक चौरे, सुमन बर्डे, मीना वाक चौरे, शकुंतला विरकर, गीताबाई टुपके, रघुनाथ जाधव व अलका टुपके.
निवडणूक मुख्याधिकारी राहुल जाधव व कोपरगावचे पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.