कोकण इतिहास परिषदेचे तिसरे अधिवेशन गोवा राज्यातील फोंडा येथे गोमंतक संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ आणि ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक भास्करराव धाटांवकर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यंदा परिषदेतर्फे ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन विभागांत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. अनुक्रमे डॉ. रिबसी, डॉ. जी. टी. कुलकर्णी आणि डॉ. मंजिरी कामत हे या विभागांच्या अध्यक्षस्थानी आहेत. कोकणचा इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे शोधनिबंध या अधिवेशनात सादर केले जाणार आहेत. अधिवेशनात इतिहासविषयक उत्कृष्ट पुस्तकास रावबहादूर साठे पारितोषिक देण्यात येणार आहे.
गोमंतक संवर्धन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष प्रा. भूषण भावे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. वर्षां कामत, महाराष्ट्रातून परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, उपाध्यक्ष रवींद्र लाड, सदाशिव टेटविलकर आदी जण अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. इतिहासप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. संपर्क- प्रा. भारती जोशी- ९९८७७८३८२३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा