कामगार नेते बाळासाहेब मुनिश्वर व स्थल सेवा सुभेदार मोहन मुरलीधर आवळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थनिमित्त महाराष्ट्र स्टेट पॅरालिम्पिक असोसिएशनच्या वतीने ‘साफल्य’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० व २०११ या वर्षांसाठी कोल्हापूरच्या पॅरालिम्पिक खेळाडूंना हा मान मिळाला.     
रविवार दि. १६ डिसेंबर २०१२ रोजी ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालय नागपूर येथे साफल्य २०१० व २०११चे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळय़ामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत साफल्य पुरस्कार प्राप्त केले.
यामध्ये उत्कृष्ट राज्य पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजन पुरस्कार २०१०, उत्कृष्ट राज्य पॅरा खेळाडू २०१०, अनिल बंडू पोवार (मैदानी व आर्चरी), उदयोन्मुख राज्य पॅरा खेळाडू पुरुष २०११, स्वप्निल संजय पाटील (जलतरण) व उदयोन्मुख राज्य पॅरा खेळाडू महिला २०११, सुरेखा कृष्णात पोवार (मैदानी) या खेळाडूंनी आपली चमक दाखविली.     
या सर्व पुरस्कार विजेत्यांना गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचे संस्थापक जयराम देसाई व संचालक दौलत देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या वेळी पॅरा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Story img Loader