कोकण कला अकादमी आणि माजी आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण चषक २०१२ एकांकिका स्पर्धे’चा बक्षीस समारंभ अलीकडेच ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मोठय़ा उत्साहात साजरा झाला. या स्पर्धेत जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘कोंडी’ एकांकिका सर्वोत्तम ठरली. यावेळी सवरेत्कृष्ट एकांकिका, सवरेत्कृष्ट अभिनय (स्त्री आणि पुरुष), सवरेत्कृष्ट दिग्दर्शन या गटांमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदा स्पर्धाचे सातवे वर्ष होते. सवरेत्कृष्ट एकांकिका गटातून ‘कोंडी’ साठी जोशी-बेडेकर विद्यालयाने प्रथम, ‘इमोशनल अत्याचार’साठी विवा विद्यालयाने द्वितीय आणि ‘हार के बाद जीत है’ साठी अण्णासाहेब पाटील विद्यालयास तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सवरेत्कृष्ट अभिनयासाठी पुरुष गटांतून श्रेयस राजे प्रथम, सागर सकपार द्वितीय तर अजिंक्य तळवडेकरने तृतीय क्रमांक पटाकविला आहे. तसेच सवरेत्कृष्ट अभिनयासाठी स्त्री गटातून तृप्ती गायकवाडने प्रथम, अमृता आमडोस्करने द्वितीय आणि स्नेहल साईल हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सवरेत्कृष्ट दिग्दर्शन गटात अमोल भोर – प्रथम, महेश आणि मनीष-द्वितीय आणि सागर भांडारकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच सवरेत्कृष्ट लेखनासाठी मनीष सोपारकर आणि संदीप दिघे यांना सन्मानित करण्यात आले. सवरेत्कृष्ट नेपथ्यासाठी विनीत म्हात्रे, पाश्र्वसंगीतासाठी अमोल संकुलकर आणि प्रकाशयोजनेसाठी अमोघ फडके यांचा गौरव करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा