ठाण्याजवळच वसलेल्या भिवंडी, वाडा, कल्याण, बदलापूर, जव्हार आणि मोखाडा यांसारख्या विविध गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावांमध्ये विविध प्रकल्प उभे करावेत या उद्देशाने कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बोईसर येथे कोकण कृषी विकास परिषद आयोजित करण्यात येणार असून यापरिषदेसाठीची पूर्व तयारी सभा रविवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ठाण्यातील ठाणा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. पितांबरीचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, प्रकाश देवळेकर आणि संदेश केसरकर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक शेतकरी आणि शेती व्यवसायाशी संबंधीत उद्योजकांनी यासभेस उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२१२५५०१६

Story img Loader