‘पाद्री मोगांन पडला’ या नावाचे कोंकणी नाटक सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहे. गोव्यात या कोंकणी नाटकाला तेथील प्रेक्षकांनी अक्षरश: तुडुंब गर्दी केली आहे. या प्रेक्षकप्रिय नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग नुकताच नेरुळ येथील डॉन बॉस्को सभागृहात झाला. नवी मुंबईतील तमाम कोंकणी रसिकप्रेक्षक या प्रयोगाला आवर्जून उपस्थित होते. नाटकाचे यापुढचे प्रयोग २ डिसेंबरला सकाळी १० वाजता रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे तर त्याच दिवशी मेरी इमेक्लेट स्कूल हॉल, बोरिवली पश्चिम येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. गोव्यातील मिनेझिस थिएटर या नाटक कंपनीने हे नाटक रंगभूमीवर आणले असून ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे नाटककार मारिओ मिनेझिस यांनी याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या नाटकात श्ॉरोन मॅजारेलो, रोझी अल्वारिस, विनोदी अभिनेत्री जुआना, रिओमा, लॉरीट त्रावासो, विनोदी कलावंत बेन अॅवान्जलीस्टो, फादर नॅव्हिल ग्रेशिअस, मायकल, डॉमनिक, क्रूझ, जॉन हॅट्स, बॉबॅट आदी कलावंतांनी अभिनय केला आहे.
कोंकणी नाटक ‘पाद्री मोगांन पडला’
‘पाद्री मोगांन पडला’ या नावाचे कोंकणी नाटक सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहे. गोव्यात या कोंकणी नाटकाला तेथील प्रेक्षकांनी अक्षरश: तुडुंब गर्दी केली आहे. या प्रेक्षकप्रिय नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग नुकताच नेरुळ येथील डॉन बॉस्को सभागृहात झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-12-2012 at 01:51 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkani drama padri mogan padla