कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल सकाळी साडेदहा वाजलेपासून २ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कायम आहे. धरणात सुमारे २० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असताना दरवाजांसह पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात १६,७०९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरण व्यवस्थापनाकडून पाणीसाठा नियंत्रित राखत पुराचा संभाव्य धोका  टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, धरणक्षेत्रासह त्याखालील कराड व पाटण तालुक्यात श्रावणातील ऊन – पावसाचा खेळ सुरूच आहे.  
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २२ एकूण ४,६८६, महाबळेश्वर विभागात ३३ एकूण ५,०३८ , प्रतापगड ६० एकूण ४, २६८ तर, नवजा विभागात ५४ एकूण सर्वाधिक ५,५२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात धरणक्षेत्रात सरासरी २५ मि. मी. पावसाची नोंद आहे. कोयना जलाशयाची पाणीपातळी २,१५८ फुट ६ इंच तर, पाणीसाठा ९८.७८ टीएमसी म्हणजेच ९३.८५ टक्के आहे. चालू हंगामातील ६६ दिवसात दररोज सरासरी २ टीएमसीपेक्षा जादा पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात १३३ टीएमसी पाण्याची आवक होताना  सुमारे ५६ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणी वापराविना वाया गेले आहे. तर, सुमारे ११ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी कारणी लागले आहे. कोयना धरणातून हा एकंदर विसर्ग सुमारे ६७ टीएमसी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा