कुचीपुडी डान्स अॅकॅडमीचा २८ वा वर्धापन दिन अलिकडेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी संतांच्या अभंग रचनांवर आधारित ‘नृत्यांचा अभंग नृत्य खळी’ हा कार्यक्रम या वर्धापन दिनाचे प्रमुख वैशिष्टय़ होते. संस्थापक संचालिका विजया प्रसाद यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात अॅकॅडमीच्या शिष्यगणांनी संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, रामदास, तुकाराम आदी संतांच्या तसेच होनाजी बाळा यांच्या रचनांवर आधारित कुचीपुडी पद्धतीची नृत्ये सादर केली. बहिणाबाईच्या काव्याने विठुनामाच्या गजरात या कार्यक्रमाची सांगता झाली.
सुचित्रा राणे, दीप्ती नायर, संगीता नायक, मयुरा दळवी, सायली जोशी, दर्शना डांगे आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला. उपवन आर्ट फेस्टिव्हलचे अध्यक्ष अरुण कुमार, स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक हरिहरन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. रसिका फडके यांनी संगीत संयोजन तर अमित राणे यांनी सूत्र संचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा