मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्य़ात फरारी असलेल्या महिला आरोपीस तब्बल २४ वर्षांनंतर पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे पोलिसांनी पकडले. या बरोबरच चकलांबा परिसरात ८ वर्षांपूर्वी पडलेल्या दरोडय़ाच्या गुन्ह्य़ातील दोन आरोपींनाही स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.
बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन १९८९मध्ये एका महिलेचे मंगळसूत्र चोरीची घटना घडली होती. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. सत्यभामा मरिबा जाधव (वय ५५) असे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेचे नाव आहे.
तब्बल २४ वर्षांनंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून या महिलेला अटक करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत २००४मध्ये दाखल दरोडय़ाच्या गुन्ह्य़ातील फरारी असलेल्या भगवान उत्तमराव सुपेकर व रमेश भागचंद जगताप (बालमटाकळी) यांनाही पोलिसांनी तब्बल आठ वर्षांनंतर अटक केली. पोलीस निरीक्षक सी. डी. शेवगण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मंगळसूत्र चोरीतील महिलेस तब्बल २४ वर्षांनी पकडले!
मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्य़ात फरारी असलेल्या महिला आरोपीस तब्बल २४ वर्षांनंतर पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे पोलिसांनी पकडले. या बरोबरच चकलांबा परिसरात ८ वर्षांपूर्वी पडलेल्या दरोडय़ाच्या गुन्ह्य़ातील दोन आरोपींनाही स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies accused arrested after 24 years of chain snaching