फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने येथील तुपसाखरे लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात ६० पेक्षा अधिक महिला डॉक्टरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या समारंभास प्रसिद्ध वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉ. नलिनी बागूल यांची प्रमुख उपस्थिती होती. समर्पित वृत्ती, रुग्णांसाठी उपलब्ध असणे आणि उच्चतम ध्येयवाद यांच्या उत्तम समन्वयाने वैद्यकीय क्षेत्रात यशाचे शिखर गाठणे कठीण नाही. सर्वच क्षेत्रात महिला अतिशय यशस्वी कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन डॉ. बागूल यांनी याप्रसंगी केले. व्यासपीठावर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा औंधकर, सचिव डॉ. हरी लाहोटी, खजिनदार डॉ. गुलाब घरटे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गौरी पिंप्राळकर आदी उपस्थित होते.
यावेळी निम्म्याहून अधिक महिला डॉक्टरांनी मनोगत, अनुभव आणि यशोगाथा मांडली. विशेषत: स्त्रीभ्रूण हत्या, महिला सबलीकरण, समानता आदींचा धांडोळा घेणाऱ्या स्वरचित कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Story img Loader