शहर काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांना सासऱ्याच्या नावावर असलेल्या व परस्पर विक्री केलेला भूखंड पुन्हा हस्तांतर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. सासूचे बेकायदा मुखत्यारपत्र तयार करून सदर भूखंडाची परस्पर विक्री केल्याचा साबळे यांच्यावर आरोप आहे.
शहरातील शिव कॉलनी लगतची प्रिंपाळा शिवारातील जमीन दत्तात्रय वंजारी यांच्या मालकीची आहे. ते आजारी असताना त्यांचे जावई उल्हास साबळे यांनी सासू इंदुबाई यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत बेकायदा मुखत्यारपत्र तयार करून सदर भूखंडाची इतर वारसांना बेदखल करून परस्पर विक्री केल्याचा साबळे यांच्यावर आरोप आहे.
या मालमत्तेतील हक्कदार दत्तात्रय व इंदूबाईची मुलगी सुनीता इप्पर यांनी या संदर्भात जळगाव न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे.
या प्रकरणात सर्व वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने इप्पर यांचा अर्ज मंजूर केला. या दाव्याचा अंतीम निर्णय होईपर्यंत जमिनीचे हस्तांतर करू नये, असा आदेशच न्यायालयाने दिल्याने साबळे
यांना चपराक बसल्याची प्रतिक्रिया संजय इप्पर यांनी व्यक्त केली आहे.
भूखंड विक्री प्रकरणात उल्हास साबळे अडचणीत
शहर काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांना सासऱ्याच्या नावावर असलेल्या व परस्पर विक्री केलेला भूखंड पुन्हा हस्तांतर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. सासूचे बेकायदा मुखत्यारपत्र तयार करून सदर भूखंडाची परस्पर विक्री केल्याचा साबळे यांच्यावर आरोप आहे.
First published on: 06-12-2012 at 02:39 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land sale case ullhas sable came in difficult