जिल्हय़ात ११ ठिकाणी मनसेने रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.
काही ठिकाणी रास्ता रोकोआधीच पोलिसांनी ‘मनसे रोको’ केले. निलंगा, िपपळफाटा, शिरूर अनंतपाळ, लातूर शहर, देवणी, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औराद शहाजनी, मुरूड येथे मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. लातूर-हैदराबाद रस्त्यावर निलंगा येथे जिल्हाप्रमुख अभय साळुंके, डॉ. नरसिंग भिकाणे, सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दीड तास चालले. या वेळी पोलिसांनी ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
िपपळफाटा रेणापूर येथे जिल्हाप्रमुख संतोष नागरगोजे व गंगासिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली पाऊणतास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी ३५ कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. लातूर शहरात नांदेड रस्त्यावर फिनॉमिनल रुग्णालयासमोर बालाजी जाधव, गीता गौड, सुनील मलवाड, पप्पू धोत्रे, राज क्षीरसागर, भारत बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. औराद शहाजनी व मुरूड येथे रास्ता रोको करण्याआधीच पोलिसांनी मनसे रोको केले.

Story img Loader