चालू आíथक वर्षांसाठी जिल्हा वार्षकि योजनेंतर्गत उपलब्ध निधीपकी ५२ टक्के निधी खर्च करून लातूरने राज्यात आघाडी घेतली.
योजनेंतर्गत जिल्हय़ातील विविध विभागांना १२८ कोटी रुपये जुलैमध्ये वितरित करण्यात आले. नोव्हेंबरअखेपर्यंत ६६ कोटी ५ लाख रुपये खर्च झाले. पाच महिन्यांत विविध विभागांनी ५२ टक्के निधी खर्च केला. लातूरपाठोपाठ गडचिरोली, सोलापूर या जिल्हय़ांनीही ५० टक्के निधी खर्च केला, तर बीडने ४९ टक्के निधी खर्च करून तिसरे स्थान प्राप्त केले. जिल्हा वार्षकि योजनेंतर्गत आरोग्य, शिक्षण, ग्रामीण स्वच्छता, पाणीपुरवठा, क्रीडा, रस्ते या विविध क्षेत्रांतील विकासकामांचा प्राप्त झालेला निधी खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांची बठक घेतली. बठकीत सर्व विभागांनी १०० टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या विभागाकडून निधी अखíचत राहण्याची शक्यता आहे, त्यांनी निधी त्वरित जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून मार्चपूर्वीच सर्व खर्च केला जावा, अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे. सर्वसाधारणपणे लवकर निधी खर्च न करता मार्च महिन्यात निधी खर्च केला जातो. आचारसंहितेमुळे अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी लातूरच्या प्रशासनाने पूर्वनियोजन सुरू केले आहे. नियोजन विभागाला तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी दिले आहेत, त्यानुसार खर्चाची लगबग सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा