महापालिकेचे पहिले आयुक्त रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ उद्या (शनिवारी) सर्वपक्षीय ‘लातूर बंद’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, बसपा, शेकाप आदींचे नेते या वेळी उपस्थित होते. जयवंशी यांनी महापालिकेला शिस्त लावण्यासाठी आपल्या कारकीर्दीत प्रयत्न केले. भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठीची त्यांची भूमिका स्पष्ट असल्यामुळेच त्यांना सत्ताधारी मंडळींनी विरोध केला. त्यांची अतिशय नामुष्कीने बदली केली गेली, असा आरोप या वेळी करण्यात आला.
आमदार अमित देशमुख यांनीच आपले वजन खर्ची करून जयवंशी यांची बदली केल्याचा आरोप पत्रकार बैठकीत करण्यात आला. जिल्हाधिकारी बिपीन शर्मा स्थानिक आमदारांची हुजरेगिरी करतात, तशी हुजरेगिरी जयवंशी यांनी करण्यास नकार दिल्यावरूनही त्यांची बदली करण्यात आली असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. उद्याचा ‘बंद’ लातूरकरांनी यशस्वी करण्याचे आवाहनही पत्रकार बैठकीत करण्यात आले. 

Story img Loader