लातूर महोत्सवात यंदा नव्याने शब्दोत्सव या नवीन उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. दि. १०, ११ व १२ जानेवारीला हा महोत्सव होणार आहे.
पीव्हीआर चित्रपटगृहाच्या प्रांगणात दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत शब्दोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि लातूर क्लबचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी यंदा शब्दोत्सवाचा उपक्रम समाविष्ट केला. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, अरुण कोल्हटकर, लेखक भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, भाऊ पाध्ये, श्री. ना. पेंडसे तसेच नाटककार विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांच्या साहित्यकृतीवर चर्चा होणार आहे.
शब्दोत्सवात राज्यातील ख्यातकीर्त मंडळींचे मार्गदर्शन मिळणार आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर व ज्येष्ठ पत्रकार निळू दामले रविवारी (दि. १२) मार्गदर्शन करणार असल्याचे संयोजक अजय पांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांना भेटी दिल्या. महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
कवी रमेश चिल्ले व ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते शब्दोत्सवाचे संयोजक आहेत. विजय दबडगावकर, विकास कुलकर्णी, दिलीप आरळीकर, प्रा. शारदा बच्चेवार, प्रकाश घादगिने, विवेक सौताडेकर आदी हा उपक्रम यशस्वी करण्यास कार्यरत आहेत. शब्दोत्सवात डॉ. रवि बापट यांची मुलाखतही रंगणार आहे. मििलद बोकील, मेघना पेठे आणि नीरजा यांच्या साहित्यातील स्त्री-पुरुष संबंधावरील गप्पांची मेजवानीदेखील संयोजकांनी उपलब्ध करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा