लातूरकरांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या लातूर फेस्टिव्हलला उद्या (शुक्रवारी) प्रारंभ होत आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.
आजी-आजोबा पार्क येथील अॅम्फी थिएटरवर पंडित संजीव अभ्यंकर यांचे उद्या सकाळी ७ ते ९ या वेळेत शास्त्रीय गायन होईल. सकाळी ९ ते दुपारी १२, तसेच १ ते ३ मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दुपारी ३ ते संध्याकाळी ६ महिलांसाठी कार्यशाळा आहे. सायंकाळी साडेपाचला मुलांना मुकुंदकुमार यांच्या जादूच्या प्रयोगाची पर्वणी आहे. रात्री ८ वाजता मेधा घाडगे यांचा लावणीचा कार्यक्रम होईल.
दयानंद सभागृहात दिवसभर नृत्यस्पध्रेची अंतिम फेरी चालणार आहे. रात्री साडेनऊ वाजता ‘राशोमन ब्ल्युज’ हे िहदी नाटक होईल. बाजार समिती सभागृहात पु. ल. देशपांडे स्मृती नाटय़ स्पध्रेतील अंतिम फेरीचे नाटक पुन्हा सादर केले जाईल. रात्री साडेनऊला ‘विच्छा माझी पुरी करा’ हे मराठी नाटक होईल. क्रीडासंकुल मदानावर सायंकाळी ६.३० वाजता फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यानंतर तौफिक कुरेशी व नंदेश उमप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. टाऊन हॉल मदानावर पुस्तक प्रदर्शन व फुड फेस्टिव्हल होणार आहे.
पीव्हीआर टॉकीजच्या प्रांगणात शब्दोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळी १० वाजता ‘चिरंतनाचं गाणं’ या सत्रात मराठी कवींच्या कवितेचा आजच्या कवीने घेतलेला सौंदर्यशोध या उपक्रमांतर्गत अंजली जोशी, संजय जोशी, सलील वाघ, गोिवद काजरेकर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात श्रीकांत उमरीकर, इंद्रजित भालेराव, रंजन कंधारकर, विश्वनाथ दशरथे, गिरीश काळे संवाद साधतील. पीव्हीआर टॉकीजमध्ये अॅनिमेशन चित्रपटांचा खजिना खुला होणार आहे. याच प्रांगणात कलाप्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. सर्व ठिकाणी प्रवेश खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. लातूरकरांनी फेस्टिव्हलचा आनंद घेण्याचे आवाहन लातूर क्लबचे अध्यक्ष अमित देशमुख व संयोजकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा