महापालिकेच्या प्रभाग ३० अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पंडित कावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राची गायकवाड यांचा दारुण पराभव केला. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेसने खेचून आणली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक महादेव (पप्पू) गायकवाड यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक झाली. रविवारी ५ हजार ७३३पकी ३ हजार ५६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६२.११ टक्के मतदान झाले. सोमवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मतमोजणी पार पडली. कावळे यांना २ हजार ३०, तर राष्ट्रवादीच्या गायकवाड यांना १ हजार ६९ मते मिळाली. कावळे ९६१ मतांनी विजयी झाले. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहराच्या विकासाची घोडदौड सुरू होत आहे, हे जनतेला पटले असल्याची पावतीच या निकालाने दिली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. समद
पटेल यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे सर्व कार्यकत्रे विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील होते. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचाही हा विजय असल्याचे ते म्हणाले.
लातूरचा पूर्व भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला होता. महापालिकेच्या निवडणुकीत पूर्व भागातील प्रभागात राष्ट्रवादीने चांगलीच आघाडी घेतली होती. प्रभाग ३०च्या विजयाने काँग्रेसच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा