‘दौडेगा भारत, जुडेगा भारत’, ‘अमर रहे अमर रहे, सरदार वल्लभभाई अमर रहे’ आदी घोषणांसह थंडीची लाट असतानाही युवकांची मोठी गर्दी एकता दौडमध्ये सहभागी झाली होती.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशातील ५६५ शहरांत एकता दौडचे आयोजन केले होते. शहरात टाऊन हॉल मदानावरून दौड सुरू झाली. १०७ वर्षांचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिक जगन्नाथ कडतने यांच्या हस्ते मशाल पेटवून पक्षाचे सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे देण्यात आली. गांधी चौक, हनुमान चौक, सुभाष चौक, भांडेगल्ली माग्रे ही दौड गंजगोलाईत नेण्यात आली.
माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोिवद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, डॉ. सुनील गायकवाड, रामचंद्र तिरुके, गुरुनाथ मगे, सुधीर धुत्तेकर, अभिमन्यू पवार, अॅड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. गीतांजली पाटील, प्रवीण कस्तुरे, प्रवीण सावंत, प्रदीप पाटील खंडापूरकर, दिनेश गिल्डा, मीनाक्षी उधारे, प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. मन्मथ भातांब्रे आदी तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा