सुजाण पालक आणि जागरूक नागरिक यांच्या समन्वयात उद्याच्या संपन्न आणि बलशाली भारताचे स्वप्न दडलेले असून त्या दृष्टीने पावले उचलणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले. फॅमिली फिजीशियन्स असोसिएशन आणि निमा, न्यू नाशिक यांच्यावतीने आयोजित धन्वंन्तरी पूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात सहायक पोलीस आयुक्त गणेश शिंदे, ‘एफपीए’ अध्यक्ष डॉ. प्रतिभा औंधकर, निमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉ. उल्हास कुटे, डॉ. हरिकिसन लाहोटी, डॉ. अभिनंदन कोठारी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. जयंत वाघ, डॉ. राजेंद्र जाधव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी वैद्यकीय आणि पोलीस क्षेत्रातील साम्यस्थळे आपल्या खुमासदार शैलीत कथन केली.  सूत्रसंचलन डॉ. अनिता गुजराथी यांनी केले तर डॉ. अभिनंदन कोठारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉक्टर सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader