प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना विभागातील दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला बिलंब लागणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबपर्यंत शिकाऊ परवान्यासाठी आळंदी रस्त्यावरील कार्यालयात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
शिकाऊ परवाना विभागातील यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने ८ डिसेंबरपासून त्याच्या दुरुस्तीबरोबर नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
हे काम १६ डिसेंबपर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, या कामाला आणखी वेळ लागणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कालावधीत आळंदी रस्ता, फुलेनगर येथील कार्यालयात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
पूर्वीचा पक्का परवाना असताना नव्या वर्गासाठी परवाना हवा असणाऱ्यांसाठी मुख्य कार्यालयातच सुविधा उपलब्ध आहे. मात्र, नव्या शिकाऊ परवान्यासाठी फुलेनगर येथील कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहेत.
या कार्यालयातील क्षमता कमी असल्याने प्रथम येणारे २५० अर्जच स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे परवान्याची तातडीची गरज असणाऱ्यांनीच त्यासाठी या कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.    

Story img Loader