बाíशटाकळी तालुक्यातील जनुना शिवारात एका शेतातील एका विहिरीत बिबटय़ाचे पिल्लू पडल्याची घटना आज सकाळी घडली. ही माहिती लोकांना होताच त्याची गावात एकच चर्चा झाली व मग त्या बिबटय़ाच्या पिल्लास बाहेर काढण्यासाठी सर्वानी धावाधाव केली. संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकाच्या जवानांनी प्रयत्न केले, तसेच वनविभागाने देखिल प्रयत्न केले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. वनविभागाने त्या विहिरीत झाडे टाकून या पिल्लाला यावर येणे सुकर केल्याने ते वर येऊ शकले.
त्याचे वय अंदाजे दोन वर्षांचे शावक जनुना जंगलातील विहिरीत पडल्याची माहिती प्राप्त होताच या परिसरात एकच खळबळ उडाली. काही तासातच वन्यजीव व वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या विहिरीतून त्या पिल्लाला कसे बाहेर काढता येईल, याचे प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, िपजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकाची सुद्धा या कामासाठी मदत घेण्यात आली आहे. त्यांचेही अथक प्रयत्न सुरू होते. पातूर शहरापासून साधारणत ३० कि.मी.अंतरावरील जनुना गावात ही घटना घडली. त्या शेताचे मालक किरण बोळे हे आपल्या शेतात गेले असता विहिरीतील मोटार पंप सुरू करण्यासाठी ते विहिरीत उतरले असता त्यांना विहिरीच्या कपारीत बिबटय़ा बसलेला आढळून आला. ते बिबटय़ाचे पिल्लू असल्याचे त्यांना माहिती नव्हते. तो पूर्ण मोठा बिबटय़ा असावा, या भीतीने बोळे हे विहिरी बाहेर आले व त्यांनी ही बाब गावात सांगण्यासाठी गावाकडे पलायन केले व गावात जाऊन सगळ्यांना ही बाब सांगितली. ही बातमी ऐकताच गावकऱ्यांनी बिबटय़ा पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमायला प्रारंभ केला. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर जाताच त्यांनी देखिल तेथे धाव घेतली व त्या शावकाला विहिरीबाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले. इतर विभागासह बाíशटाकळी पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली.
वनविभागाचे अधिकारी दुबे, भोसले, सुरजुसे, चव्हाण, हातोले, सानप, संजय नपते, तसेच वन्यजीव विभागाचे गोिवद पांडे यांनी तेथे धाव घेऊन मार्गदर्शन केले. प्रखर उन्हामुळे तहानलेल्या प्राण्यांनी आता मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. या भागात बऱ्याच वेळा लोकांना बिबटय़ा दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. कदाचित बिबटय़ाचे हे शावक पाणी पिण्यासाठी तेथे आले असावे, असे मानले जात आहे.
जनुना शिवारात विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाला वाचविले
बाíशटाकळी तालुक्यातील जनुना शिवारात एका शेतातील एका विहिरीत बिबटय़ाचे पिल्लू पडल्याची घटना आज सकाळी घडली.
आणखी वाचा
First published on: 10-06-2014 at 07:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard cubs life saved