ओ हेन्रीच्या ‘द लास्ट लीफ’वर बेतलेली कथा आणि रणवीर सिंग-सोनाक्षी सिन्हा अशी वेगळी जोडी यामुळे ‘लुटेरा’ चित्रपट हा गर्दीतल्यांपेक्षा वेगळा असणार आहे. कथाच मुळी थोडी जुन्या काळातील असल्याने नायक-नायिकांचा लूक, एकंदरीत चित्रपटातील वातावरणही जुना काळ दाखवणारे आहे. प्रेक्षकांच्या मनात पहिल्यापासूनच या क थेने रुंजी घालावी, यासाठी दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे आणि निर्मात्यांनी एकेक शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी त्यांनी ‘लिबर्टी’ थिएटरची निवड केली आहे.
‘लिबर्टी’ हे मुंबईतील सर्वात जुने चित्रपटगृह आहे. १९४७ साली दक्षिण मुंबईत स्थापन झालेल्या या चित्रपटगृहात आजवरचे सगळे जुने हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटगृहाचे स्वरूप आणि त्या काळी त्याबद्दल असलेले आकर्षण लक्षात घेऊन ‘लुटेरा’साठी हवा तसा माहौल इथे तयार करता येऊ शकेल असा विचार करून मंडळींनी चित्रपटाच्या ट्रेलरसाठी ‘लिबर्टी’च हवे, असा निर्णय घेतला. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी ‘लिबर्टी’ गाठण्याशिवाय पर्याय नाही. ‘लुटेरा’चे चित्रीकरण सुरू झाल्यापासून चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.
पहिल्यांदा रणवीर आणि सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणामुळे, मग प्रेमभंगामुळे, नायक-नायिका स्थिरस्थावर झाले तर डलहौसीच्या हिमवृष्टीमुळे चित्रपटाचा स्टुडिओच कोसळला.. या सगळ्या गोष्टींमुळे ‘लुटेरा’ चित्रपट कायम चर्चेत राहिला आहे. ‘उडान’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणेकडून आणखी एका चांगल्या चित्रपटाची अपेक्षा नक्कीच आहे.
‘लुटेरा’साठी घेतली ‘लिबर्टी’
ओ हेन्रीच्या ‘द लास्ट लीफ’वर बेतलेली कथा आणि रणवीर सिंग-सोनाक्षी सिन्हा अशी वेगळी जोडी यामुळे ‘लुटेरा’ चित्रपट हा गर्दीतल्यांपेक्षा वेगळा असणार आहे. कथाच मुळी थोडी जुन्या काळातील असल्याने नायक-नायिकांचा लूक, एकंदरीत चित्रपटातील वातावरणही जुना काळ दाखवणारे आहे.
First published on: 17-03-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liberty taken for lutera