मराठवाडय़ातील पहिले त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गिरीश सावजी यांना त्वचारोग संस्थेकडून जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. औरंगाबाद येथे वैद्यकीय सेवा करणारे डॉ. गिरीश सावजी हे गोविंद वन या रुग्णालयात आठ हजार रुग्णांवर दरवर्षी मोफत उपचार करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
१९७४ मध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरुवात केली. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा संबंध असून एड्स जागृती व लैंगिक शिक्षण या विषयावर ते काम करत असतात. मोफत आरोग्य शिबिरे घेऊन त्यांनी गरीब व मागास रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली. महाराष्ट्र त्वचारोग संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन डॉ. सावजी यांना सन्मानित केले.
आणखी वाचा