तालुक्यातील लिंबी येथील जि. प. शाळेतील शिक्षक आर. व्ही. मुजमुले मुख्यालयी न राहता अनाधिकृतरीत्या जि. प. वसाहतीतील निवासस्थानात राहून इमारत भाडे न भरता घरभाडेभत्ता घेतात, या कारणावरून जि. प. प्रशासनाने त्यांना निलंबित केले.
मुजमुले हे जि. प.च्या इमारत क्रमांक एकमधील गाळा क्रमांक ९मध्ये १४ सप्टेंबर २०१०पासून कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत राहत आहेत. इमारत भाडे न भरता, घरभाडेभत्ता घेतात. आर्थिक अभिलेखे उपलब्ध न करून देणे, शाळेच्या परिपाठास उपस्थित न राहणे, वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांशी असभ्य वर्तन, शासकीय निधीचा अपव्यय, शालेय पोषण आहाराची देयके मुख्याध्यापकांना वाटप न करणे, शाळेत अनधिकृत गैरहजर राहणे, मुख्यालयी न राहणे अशा विविध प्रकारे कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली जि. प. प्रशासनाने या शिक्षकाला गुरुवारी निलंबित केल्याचा आदेश काढण्यात आला.