दहा पानांचा मजकूर व लांबलचक भाषणातून होणारी फलनिष्पत्ती चार रेषेतही होऊ शकते, ती व्यंगचित्रकलेतून. त्यामुळे रेषाही भावना प्रगट करण्याचे एक साधन असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी केले.
शहरातील राजाराम कलादालनात लायन्स क्लबच्या वतीने आयोजित राजेंद्र सरग यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक व लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय टाकळकर होते. कल्पना सरग, पत्रकार नितीन धूत, दिलीप माने आदी उपस्थित होते.
मित्रगोत्री म्हणाले की, व्यंगचित्रे रेखाटणे काही सोपे काम नाही. त्यासाठी सर्व स्तरातील चांगल्या-वाईट बाबींचा अभ्यास असणे आवश्यक असते. व्यंगचित्रे केवळ मनोरंजनच करीत नाहीत, तर समाजातील वास्तवाचे प्रतिबिंबही दाखवित असतात. सरकारी नोकरी करीत व्यंगचित्राची कला जोपासत सुरू असलेल्या सरग यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात सरग यांनी व्यंगचित्राबद्दल लागलेली ओढ व त्या रूपाने रेखाटलेल्या आठ हजार व्यंगचित्रांचा प्रवास विशद केला. सूत्रसंचालन राजेश येसनकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा