महाराष्ट्रातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी बुधवारी (दि. २१) नगरला येत आहे. त्याच्या उपस्थितीत डीएलबी ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘कै. शांतीकुमार फिरोदिया अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धे’चे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
यावेळी विदित एकाच वेळी १५ खेळाडूंबरोबर सायमल पद्धतीने लढत देणार आहे.
डीएलबी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत बापट यांनी ही माहिती दिली. विदित सध्या १८ वर्षांचा असून त्याने वयाच्या १० व्या वर्षीपासून विक्रम नोंदवले आहेत.
सलग तीन वर्षे त्याने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले व वयाच्या १२ व्या वर्षी त्याने फिडेमास्टर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सध्या त्याचे मानांकन २५३५ आहे. इयत्ता दहावीतही त्याने ९२.३६ टक्के गुण प्राप्त केले.
स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला असून काही दिग्गज खेळाडूंसह किमान २०० खेळाडू सहभागी होतील, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते होत आहे. यावेळी संगमनेरमध्ये बुद्धिबळाचा प्रसार व प्रचार करणारे डॉ. आशुतोष माळी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.        

Story img Loader