शिरोळ तालुक्यात कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन केली आहे. सहकारी सेवा सोसायटय़ाकडून पैसे गोळा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करूनही याचा लाभ सर्व सामान्य शेतकऱ्याला झाला नाही. समितीला शेतकऱ्यांना न्याय मिळूवन द्यावयाचा नाही. अशी टीका गौरवाड (ता.शिरोळ) येथील अन्वर जमादार यांनी पत्रकाद्वारे कली आहे.
जमादार यांनी कर्जमाफी वसुलीविरोधी उच्च न्यायालयात व्यक्तीगत रीत्या जाऊन न्याय मिळवून घेतला होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुली विरोधात विविध स्तरावर आंदोलने सुरू आहेत. यातून काय निष्पन्न होणार? खासदार राजू शेट्टी शासनास पत्र लिहून कर्जवसुली थांबविण्याची विनंती करतात म्हणजे काय? केंद्रीय कृषी मंत्र्यांविरोधी राजकारण करणारे शेट्टी त्यांच्याकडे जाऊन कर्ज माफीबद्दल चर्चा करतात याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न जमादार यांनी पत्रकात उपस्थित केले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला यातून कर्जमाफी मिळवून देणे. त्याच बरोबर गैरकारभार करणाऱ्यांकडून सक्त वसुली करण्याची कणखर भूमिका जिल्हा बँकेने घेतली पाहिजे असे जमादार यांनी पत्रकात म्हटले आहे.
कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन
शिरोळ तालुक्यात कर्जमाफी वसुलीविरोधी अन्याय निवारण समिती स्थापन केली आहे. सहकारी सेवा सोसायटय़ाकडून पैसे गोळा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करूनही याचा लाभ सर्व सामान्य शेतकऱ्याला झाला नाही. समितीला शेतकऱ्यांना न्याय मिळूवन द्यावयाचा नाही. अशी टीका गौरवाड (ता.शिरोळ) येथील अन्वर जमादार यांनी पत्रकाद्वारे कली आहे.
First published on: 13-11-2012 at 02:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loan rlief recollecting prob sloving committee now started