चाकूर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी विषय शिकवण्यासाठी पदवीधर शिक्षकांची मागणी करत गुरुवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांसह पालकांनी टाळे ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन केले.
बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाकडे ‘गुरुजी, आम्हाला इंग्रजी शिकवा की’ असे म्हणत साकडे घातले होते. या साकडय़ामुळे गावातील पालक जागरूक होऊन त्यांनी इंग्रजीच्या शिक्षकाची मागणी करत शाळेला टाळे ठोकून धरणे आंदोलन केले. ३० जूनपर्यंत इंग्रजी शिकवण्यास शिक्षक नाही दिल्यास शाळेला टाळे ठोकून शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा गटशिक्षणाधिकारी फुलारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

Story img Loader