जिल्हय़ातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या छुप्या मदतीने राष्ट्रवादीचे मनसुबे उधळून लावताना काँग्रेसलाही धोबीपछाड घालण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली. पालिकेची प्रथमच एकहाती सत्ता मिळविताना सगळी समीकरणे व अंदाज धुळीला मिळवत भावी राजकारणाच्या दृष्टीने मनसेने जोरदार प्रारंभ केल्याचे चित्र आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची पत्नी आशाताई यांचीच निवड होण्याची शक्यता असून, त्यांच्याच निवडीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येते. नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून आशाताई चव्हाण या प्रवर्गासाठीच्या प्रभागातून निवडून आल्या आहेत.
सध्याच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ १७ डिसेंबरला संपणार असून, नवीन नगराध्यक्ष १८ डिसेंबरला सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र, मनसेचे पालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने या पदासाठी आशाताई चव्हाण यांच्या रूपाने महिलेस संधी देऊन मनसेकडून आगामी निवडणुकांसाठी पायाभरणी केली जाईल, असे संकेत आहेत. प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे-
प्रभाग १- रत्नमाला कांबळे (मनसे १,०७६), कमलबाई धुतमल (राष्ट्रवादी १,०२१ पराभूत), वनमाला पारेकर (मनसे १,१०२), वर्षां माळी (राष्ट्रवादी ७९९ पराभूत), बाबुराव डोम (मनसे १,४०४), पांडुरंग शेट्टे (काँग्रेस ८३० पराभूत), सोनू संगेवार (मनसे १,२६८), रामराव सूर्यवंशी (राष्ट्रवादी ८०९ पराभूत).
प्रभाग २- शारदाबाई निर्मले (काँग्रेस १,६२२), राणीबाई खिल्लारे (राष्ट्रवादी १,३१७, पराभूत), बानूबी शेख (काँग्रेस १,६२९), राजाबाई सोळंके (राष्ट्रवादी १,४४१ पराभूत), पंकज परिहार (काँग्रेस १,७५३), चंद्रकांत कळकेकर (राष्ट्रवादी १,०८७ पराभूत), शंकर पाटील कऱ्हाळे (काँग्रेस १,९८९), व्यंकटेश पारसेवार (राष्ट्रवादी १,०३७ पराभूत).
प्रभाग ३- गजानन सूर्यवंशी (काँग्रेस २,२६८), बाबू डिकळे (राष्ट्रवादी ९८५ पराभूत). सचिन रहाटकर (काँग्रेस १,१५७ मते), किरण वट्टमवार (राष्ट्रवादी १,०२० पराभूत). जिजाबाई वाघमारे (काँग्रेस २,१४२), विमलबाई पवार (राष्ट्रवादी १,१४४ पराभूत), वंदनाबाई पवार (काँग्रेस १,९३४), शोभा बगडे (राष्ट्रवादी १,३३९ पराभूत).
प्रभाग ४- अनिल दाढेल (मनसे २,०८२), सायन्ना देवके (राष्ट्रवादी १,४८३ पराभूत), भागूबाई मुंडे (मनसे २,१४४), अर्चना सूर्यवंशी (राष्ट्रवादी १,५६० पराभूत), रुक्मिणीबाई पवार (मनसे २,२३७), वत्सलाबाई कदम (राष्ट्रवादी १,५७८ पराभूत), आशाताई चव्हाण (मनसे २,४०३), सुमनबाई पवार (राष्ट्रवादी १,५२१ पराभूत), रुस्तुम पवार (मनसे १,९४६), करीम मोईनोद्दीन शेख (राष्ट्रवादी १,५६६ पराभूत).
लोहय़ात नगराध्यक्षपदासाठी आशा चव्हाणांचे पारडे जड
जिल्हय़ातील लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची पत्नी आशाताई यांचीच निवड होण्याची शक्यता असून, त्यांच्याच निवडीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येते.
First published on: 30-10-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loha municipality mayor asha chavan has more chances