पिंपरी ते दापोडी या मार्गावर लोहमार्गाची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी दुपारच्या वेळेत धावणाऱ्या लोणावळा लोकल १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत चिंचवडपर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. खडकी ते दापोडी या मार्गावरील लोहमार्गाची दुरुस्ती व देखभालीचे काम सध्या सुरू आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे हे काम करण्यात येत आहे. त्यासाठी आठवडय़ापासून दोन लोकल चिंचवडपर्यंत धावत आहेत. आता हे काम १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत दापोडी ते पिंपरी या टप्प्यात करण्यात येणार आहे. लोणावळय़ातून दुपारी दोन वाजता सुटणारी लोकल चिंचवडपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुण्यातून दुपारी तीन वाजता सुटणारी लोकल पुणे स्थानकाऐवजी चिंचवड येथून सोडण्यात येणार  आहे.   

Story img Loader