नांदर-अस्तगाव रस्त्यावर खंडाळय़ानजीक नगर येथील व्यापारी विनोद कांतिलाल बोरा यांना चोरटय़ांनी लुटले. त्यांच्याकडील ३ लाख रुपयांची रोकड त्यांनी चोरून नेली. या रस्त्यावर नेहमीच लूटमारीच्या घटना घडत आहेत.
नगर येथील किराणा मालाचे व्यापारी बोरा हे अस्तगाव व राहाता भागात किराणा मालाच्या उधारी वसुलीसाठी आले होते. रात्री ८.३० वाजता नांदर-अस्तगाव रस्त्याने शहराकडे मोटारीतून येत असताना त्यांना चोरटय़ांनी इंडिका मोटार आडवी घातली. बोरा यांनी गाडी थांबवताच चोरटय़ांनी खाली उतरून त्यांना गाडीतून बाहेर ओढले. त्यांना चाकूचा धाक दाखवला. बोरा व त्यांच्या चालकाचे हात-पाय बांधून त्यांना रस्त्याच्या कडेला टाकून दिले. बोरा यांच्याकडील तीन लाखांची रक्कम व मोबाइल घेऊन चोरटय़ांनी इंडिका मोटारीतून पलायन केले. रस्त्याने जाणाऱ्यांनी बोरा व त्यांच्या चालकाला सोडविले. बोरा यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.
चोरटे ज्या मोटारीतून आले होते. त्या मोटारीवर शंभुराजे असे लिहिलेले होते. त्या गाडीचा क्रमांकही पोलिसांना मिळाला आहे. पण चोरटय़ांकडे चोरीची मोटार असावी असा पोलिसांचा संशय आहे.
माळवाडगावला भुरटय़ा चो-या
तालुक्यातील माळवाडगाव येथे भुरटय़ा चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. रविवारी ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील दोन दुकाने चोरटय़ांनी फोडली. चैतन्य मोबाइल, पीयूष कलेक्शन या दोन दुकानांत त्यांनी चोरी केली. लोक जागे झाल्याने दुकानातील माल मात्र वाचला. किरकोळ रोकड रक्कम चोरीला गेली.
नगरच्या व्यापाऱ्याला अस्तगावजवळ लुटले
नांदर-अस्तगाव रस्त्यावर खंडाळय़ानजीक नगर येथील व्यापारी विनोद कांतिलाल बोरा यांना चोरटय़ांनी लुटले. त्यांच्याकडील ३ लाख रुपयांची रोकड त्यांनी चोरून नेली. या रस्त्यावर नेहमीच लूटमारीच्या घटना घडत आहेत.
आणखी वाचा
First published on: 29-10-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looted merchant of nagar near astgaon