‘गणपती बाप्पा मोरया’ चा उद्घोष, लेझीम, झांज, टिपऱ्यांचा बहारदार खेळ, हलगी- ताशांचा कडकडाट, सनईचा सुमधूर स्वर, गुलाल, अरगजा आणि फुलांची मुक्त उधळण अशा जल्लोषमय वातावरणात वाजत-गाजत मिरवणुका काढून विघ्नहर्त्यां लाडक्या श्री गणरायाचे सोलापूरवासीयांनी स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत श्री गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरुच होत्या. शहरात १३५१ सार्वजनिक मंडळांनी ’श्री’ ची प्रतिष्ठापना केली.
लाडक्या गणरायाच्या आगमनाची गेल्या दोन दिवसांपासून तमाम भक्तांना आतुरता लागली होती. उत्कंठा, लगबग आणि उत्साह सर्वत्र दिसून येत होता. विशेषत काल रविवारपासून सर्व प्रमुख बाजारपेठा खरेदीसाठी फुलून गेल्या होत्या. मधला मारुती, टिळक चौक, कौंतम चौक, राजेंद्र चौक, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक, विजापूर रोड, होटगी रोडवरील आसरा परिसर, रेल्वे स्थानक परिसर आदी भागात खरेदीचा उत्साह मोठया प्रमाणात दिसत होता. टिळक चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, जोडबसवण्णा चौक आदी भागात गणरायाच्या मूर्ती विक्रीची दालने थाटण्यात आली होती. २५ रुपयापासून ते २५ हजारापर्यंत मूर्तीचे दर होते. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदी केलेल्या मूर्ती घेऊन उत्साही वातावरणात आबालवृध्द मंडळी घराकडे येत होती.
शहरात यंदा प्रमुख सहा मध्यवर्ती मंडळांच्या अधिपत्याखाली एकूण १३५१ सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. पंचांगकत्रे मोहन दाते यांच्या माहितीनुसार दुपारी दीडपर्यंत ‘श्री’ च्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त होता. परंतु त्यासाठी गुरुजी उपलब्ध होत नव्हते. त्यातच मंडळांच्या लांबलेल्या मिरवणुका आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे ‘श्री’ च्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त लांबत गेला.
सोलापुरात गणरायाचे वाजत-गाजत आगमन
‘गणपती बाप्पा मोरया’ चा उद्घोष, लेझीम, झांज, टिपऱ्यांचा बहारदार खेळ, हलगी- ताशांचा कडकडाट, सनईचा सुमधूर स्वर, गुलाल, अरगजा आणि फुलांची मुक्त उधळण अशा जल्लोषमय वातावरणात वाजत-गाजत मिरवणुका काढून विघ्नहर्त्यां लाडक्या श्री गणरायाचे सोलापूरवासीयांनी स्वागत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ganesh festival celebrated with fanfare in solapur