विठ्ठल दर्शनास देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. हा गरिबांचा देव आहे. तो श्रीमंतांच्या तावडीत न जाऊ नये यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी येथे दिले.
येथील भक्ती मार्गावर विठ्ठल रुक्मिणी समिती संचालित आणि ‘व्हिडीओकॉन’चे सेठ नंदलाल धूत भक्तनिवासाचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, आमदार दीपक साळुंखे पाटील, मनोहर डोंगरे, सुरेश आगावणे, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव आदी होते.
पैशावरून देवाचे मोठेपण ठरत नाही. विठ्ठल हा सर्व लोकांचा, जाती-धर्माचा,गरिबांचा, श्रीमंतांचा, सामान्य कष्टकऱ्यांचा आहे. तो श्रीमंतांच्या तावडीत न जाऊ देता गरिबांचा रहावा या यासाठी प्रयत्न करू. काही देवस्थानकडे पैसाच पैसा आहे, मालमत्ता आहे. त्याचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न आहे. तर, काही देवस्थान असे आहेत त्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे प्रश्न वेगळे असून यासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करून जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र करू. पंढरपूर येथे भक्तांच्या सोईकरता महाराष्ट्रातील २८८ आमदार यांनी आमदार फंडातून १० लाख रुपये द्यावेत; त्याची सुरुवात मी १० लाख रुपये देऊन करतो असेही पाटील यांनी जाहीर केले. पंढरपूर तीर्थक्षेत्र अतिरेक्यांच्या लिस्टवर असून समिती सुरक्षासाठी जो साडेसात कोटीचा आराखडा आहे त्यासाठी प्रयत्न करू. सुरक्षेबाबत पंढरपूरसाठी प्रयत्न करेन. सर्वानी चंग बांधू.  पंढरपूर तीर्थक्षेत्र पिढय़ान् पिढय़ा सर्वांचे मनावर अधिराज्य गाजवेल. त्या करता येथे उत्तम सुविधा,आरोग्य, पाणी यासाठी प्रयत्नशील राहा. मी तुमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सांगितले.
 समिती अध्यक्ष अण्णासाहेब डांगे म्हणाले, की पंढरपुरात येणाऱ्या ७० ते ८० टक्के भक्तांना दर्शन व्हावे यासाठी समिती प्रयत्न करत आहे. दर्शन रांग ही पाच-सहा कि.मी. जाते. रांगेतील वारक ऱ्यास २५ ते ४० तास दर्शनास लागतात. हे कमी करण्यासाठी ग्रुप दर्शन सोय, ऑन लाईन दर्शन सोय कार्तिकी वारीपासून प्रायोगिक तत्त्वावर केली आहे. दर्शन रांग कमी व्हावी या साठी ५ रांगेतून दर्शन सोईचा विचार चालू आहे आजही ७५ टक्के लोक हे विठ्ठलाचे दर्शन न घेता कळसाचे दर्शन घेऊन जातात. या करता ७० टक्के लोकांचे दर्शन कसे होईल हे पहात आहे.येथे येणाऱ्यास उत्तम आरोग्य, निवास यासाठी प्रयत्न चालू आहे. चंद्रभागेची अवस्था ही गटारी पेक्षाही बिकट झाली आहे. तशातच स्नान अन् तीर्थ म्हणून नेतात ते स्वच्छ असावे या करता लक्ष द्यावे, असे डांगे यांनी सांगितले. 

कसाबच्या शिक्षेतून भारतीय न्यायाचे दर्शन
कसाबच्या फाशीवरून अनेक तर्क काढले जात आहेत. त्याला शिक्षा झाली याबाबत साऱ्या जगाने कौतुक केले. भारतातील न्याय प्रक्रिया पारदर्शक आहे, पोलीस व अधिकारी यांनी प्राण हातावर घेऊन संरक्षण केले, पोलीस सक्षम आहेत. नागरिक, पोलीस यांनी हातात हात घालून काम केले तर यातूनच आतंकवादाचा जोरदार मुकाबला होऊ शकतो. असे गृहमंत्री आर. आर.  पाटील यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास विरोध होत आहे. या बाबत विचारले असता ते म्हणाले की, महापुरुषाबाबत वाद होता कामा नये, पुतळ्यासाठी महापुरुषांना वेठीस धरू नये. शेतकरी संघटनेने आंदोलनावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असल्याचे सिद्ध झाले आहे. या आंदोलनावेळी १०० पोलीसही जखमी झाले आहेत. यातील सार्वजनिक मालमत्तेची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पालघर प्रश्नी विचारले असता पाटील म्हणाले, की पोलिसांना कायद्याची पूर्ण माहिती असते असे नाही. त्यांच्यासाठी प्रशिक्षणही घेतली जातात. पूर्ण अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल.

खासदार राजकुमार धूत यांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ५०० कोटी खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना सहकार्य असणे गरजेचे आहे, असे बाळासाहेब बडवे यांनी सांगितले. येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अनेकांची काही तरी करण्याची इच्छा असते. परंतु त्यास सहकार्य मिळत नाही. परंतु न. पा. आमचेकडे आहे. त्यांना आपण सहकार्य करू. शासनाने १२ कोटी थकीत अनुदान द्यावे, सर्वानी सेवा म्हणून काम करून उत्तम क्षेत्र पंढरी करू, असे आमदार भालके यांनी सांगितले. आर. पाटील यांचा समितीचे वतीने अण्णा डांगे यांनी सत्कार केला. तर, इतर मान्यवरांचा सत्कार सदस्य वसंत पाटील, जयंत भंडारे, बाळासाहेब बडवे यांनी केला. तर, व्हिडीओकॉनचे अग्रवाल व शहा यांचाही सत्कार समितीने केला.   

Story img Loader