महसूल विभागाकडून घरोघरी जाऊन पंचनामे केले जात आहेत. प्राथमिक अंदाजात एकंदर तब्बल २२ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, घटनास्थळी पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी भेट देऊन आपत्तीची माहिती घेतली.
सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यादरम्यान, पावसाचे प्रमाण कमी होते मात्र, वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. आपत्तिग्रस्तांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी तसेच बीपीएलधारक कुटुंबांना घरकुलासाठी प्रयत्नशील राहू असे पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस व गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले.
गावनिहाय घरांची संख्या व त्यांचे झालेले नुकसान पुढीलप्रमाणे ताईकडे २ घरे ४२ हजार, ताईगडेवाडी २७ घरे ६ लाख १४ हजार, करपेवाडी १० घरे १ लाख ६५ हजार, खळे ७ घरे १ लाख ८७ हजार, माणेगाव १ घर १५ हजार, शिद्रुकवाडी ७ घरे १ लाख ८९ हजार, पुनर्वसित गावठण ८ घरे २ लाख ४४ हजार, शिबेवाडी १० घरे १ लाख १ हजार ४००, माटेकरवाडी १५ घरे २ लाख ९२ हजार २००, खोचेकरवाडी १ घर १० हजार, माटेकरवाडी ३ घरे १० हजार, चिखलेवाडी ४ घरे ८५ हजार, चाळकेवाडी २ घरे ६२ हजार, असे एकूण १०२ घरांचे २१ लाख ७० हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तत्काळ पंचनाम्यामुळे आपत्तिग्रस्तांनी समाधान व्यक्त केले आहे. तळमावले, कुंभारगाव परिसरातील आपत्तिग्रस्त गावांमध्ये नुकसानग्रस्तांनी घरांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. काही ठिकाणी मोठे नुकसान झाल्यामुळे घरदुरुस्ती कारागिरांचीही मदत घेतली जात आहे.