कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी प्रकल्प विभागातील अभियंत्यांच्या चुकीमुळे डोंबिवलीत रामचंद्र जलकुंभ येथे जलवाहिनीतून आलेले पाणी तीन रहिवाशांच्या घरात घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पोलिसांनी तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. नुकसानीचा पहिला हप्ता म्हणून सामान्य कुटुंबातील या तीन रहिवाशांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले आहेत.
३ सप्टेंबर रोजी नेतिवली टेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून डोंबिवलीसाठी टाकण्यासाठी आलेल्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोडताना पाणी प्रकल्प विभागाच्या अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे रामचंद्र जलकुंभ येथे जलवाहिनीतील पाणी स्कंदगिरी सोसायटीच्या तळमजल्याला राहत असलेल्या तीन रहिवाशांच्या घरात घुसले. घरामध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. या पाण्यामुळे घरातील सर्व किमती ऐवजाची नासाडी झाली आहे. सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. झालेले नुकसान महापालिका प्रशासन भरून देते की नाही या विवंचनेत हे रहिवासी आहेत. पंधरा दिवस उलटले तरी नुकसानभरपाई देण्यासाठी पालिका अधिकारी फिरकले नसल्याने रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान काही रहिवाशांना दोन हजार रुपयांच्या मदतीचा पहिला टप्पा देण्यात आल्याचे काही रहिवाशांनी स्पष्ट केले.

veteran teacher gopalrav tokekar facilitated with subhedarwada award
 veteran teacher gopalrav tokekar,  teacher gopalrav tokekar facilitated, facilitated with subhedarwada award,  subhedarwada award   
ज्येष्ठ शिक्षक गोपाळराव टोकेकर यांना सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार
प्रतिनिधी, कल्याण<br />सामाजिक भावनेतून कार्य करणारे तसेच कल्याणमधील अनेक सामाजिक संस्थांच्या कार्याशी निगडित असणारे ज्येष्ठ शिक्षक गोपाळराव टोकेकर यांना सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी समिती न्यासतर्फे शताब्दी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराची रक्कम त्यांनी हिंदू सेवा संघाच्या कार्याला दिली.
कल्याणमधील सुभेदारवाडा शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला न्यासचे अध्यक्ष वामनराव साठे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, साधना टोकेकर, अरविंद भिडे, अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, सुनीता केळकर, वसंत फडके, श्रीकांत जोशी, रत्नाकर फाटक, भालचंद्र जोशी उपस्थित होते. गिरीश कुबेर यांच्या हस्ते गोपाळराव टोकेकर यांचा शेला, नारळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व पुंजी देऊन सन्मान करण्यात आला.
सुभेदारवाडा गणेशोत्सवाच्या साजरा करण्यात काळाप्रमाणे होत गेलेले बदल टोकेकर यांनी या वेळी भाषणातून विषद केले. आपण हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष आहोत. संघामध्ये सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी उपक्रम राबविले जातात. रेल्वे स्थानकातून भिकारी मुले पकडली जातात. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जाते. संघटनेच्या नावात हिंदू शब्द असल्याने या सामाजिक कार्याला देणग्या मिळणे खूप दुरापास्त होते, अशी खंत टोकेकर यांनी व्यक्त करून आपल्या पुरस्काराची रक्कम व त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम टाकून तयार झालेली देणगी हिंदू सेवा संघाला दिली. या कार्यक्रमानंतर ‘जागतिकीकरणाचे अर्थकारण’ विषयावर गिरीश कुबरे यांचे व्याख्यान झाले. जागतिकीकरण आपल्या घरापर्यंत पोहचले आहे. यासाठी आपल्या अर्थविषयक जाणिवा प्रत्येकाने प्रगल्भ केल्या पाहिजेत. काळाप्रमाणे आपल्या विचारसरणीत बदल करून अर्थविषयक जागतिकीकरणाची वाटचाल समजून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कुबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रत्नाकर फाटक, सुचिता करमरकर, स्मृती पवार यांनी सहकार्य केले.