कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी प्रकल्प विभागातील अभियंत्यांच्या चुकीमुळे डोंबिवलीत रामचंद्र जलकुंभ येथे जलवाहिनीतून आलेले पाणी तीन रहिवाशांच्या घरात घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पोलिसांनी तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. नुकसानीचा पहिला हप्ता म्हणून सामान्य कुटुंबातील या तीन रहिवाशांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले आहेत.
३ सप्टेंबर रोजी नेतिवली टेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून डोंबिवलीसाठी टाकण्यासाठी आलेल्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोडताना पाणी प्रकल्प विभागाच्या अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे रामचंद्र जलकुंभ येथे जलवाहिनीतील पाणी स्कंदगिरी सोसायटीच्या तळमजल्याला राहत असलेल्या तीन रहिवाशांच्या घरात घुसले. घरामध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. या पाण्यामुळे घरातील सर्व किमती ऐवजाची नासाडी झाली आहे. सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. झालेले नुकसान महापालिका प्रशासन भरून देते की नाही या विवंचनेत हे रहिवासी आहेत. पंधरा दिवस उलटले तरी नुकसानभरपाई देण्यासाठी पालिका अधिकारी फिरकले नसल्याने रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान काही रहिवाशांना दोन हजार रुपयांच्या मदतीचा पहिला टप्पा देण्यात आल्याचे काही रहिवाशांनी स्पष्ट केले.
नुकसान लाखाचे.. मदत दोन हजारांची
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी प्रकल्प विभागातील अभियंत्यांच्या चुकीमुळे डोंबिवलीत रामचंद्र जलकुंभ येथे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-09-2013 at 08:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss of laakh and compensation worth 2000 thousand