दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने हिंगोली जिल्ह्य़ातील शंभर हेक्टरांवरून अधिक फळबागांचे नुकसान झाले. केळी उत्पादक शेतकऱ्यांना जळगावच्या धर्तीवर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांनी केली.
फेब्रुवारी व एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. २३३८.६४ हेक्टर फळबागांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत त्यात भर पडली. सुमारे एक हजार हेक्टर जमिनीवरील फळबागांचे नव्याने नुकसान झाले. सोयाबीन, कापूस व अन्य पिकांच्या नुकसानीची ८ कोटी ८८ लाख ९० हजार एवढी रक्कम अद्याप सरकारने दिलेली नाही. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्याची मदतही अजून मिळालेली नाही. मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनीही मदत देण्याविषयी सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले होते. आता नुकसानीत नव्याने भर पडली असल्याने जळगावच्या धर्तीवर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सातव यांनी केली आहे.

Story img Loader