जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांनी आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली असून, शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील रामदास पावरा यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी त्यांच्या १९ साथीदारांसह गावातीलच प्रधान पावरा (६०) यांच्यावर लाठय़ा-काठय़ा व कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने हल्ला केला.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या या धुमश्चक्रीत हल्लेखोरांनी सखाराम इसमल पावरा, भरतसिंग पावरा, ताराचंद पावरा, सखाराम पावरा व हाडय़ा पावरा यांच्या घराचे नुकसान केले.
प्रधान पावरा यांच्या फिर्यादीवरून रामदास पावरा, दिलीप रामदास, किरण रामदास, मगन अंबालाल, सखाराम रामदा, संतोष लाला, कैलास लाला यांसह १९ जणांविरुद्ध शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातात दोन जखमी
नाशिकहून धुळ्याकडे येणाऱ्या मोटारसायकलला पुरमेपाडा शिवारात अपघात झाल्याने रूपेश वाघ (२८) आणि नितल वाघ (२२) दोन्ही रा. न्याहळोद, ता. धुळे हे जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर हा अपघात झाला. लळिंग टोलनाक्यावरील इस्कॉन कंपनीच्या रुग्णवाहिकेतून कृष्णा वाघ यांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Story img Loader