शासकीय तंत्रनिकेतनच्या अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या अस्मिता अशीत रॉय या विद्यार्थिनीने सुवर्ण पदकासह सहा पारितोषिके पटकावून सर्व शाखांमधून सर्वात जास्त पुरस्कार पटकावण्याचा मान
मिळवला.  स्थापत्य अभियांत्रिकीचे सुवर्णपदक अभिशेष किशोर शिवहरे याने तर रौप्य पदक जय ओमप्रकाश तिवारीने प्राप्त केले. यंत्र अभियांत्रिकीतील सुवर्ण व रौप्य पदके अनुक्रमे राहुल शत्रुघ्न शाह आणि अनुराग दिलीप नखाते यांना मिळाले.विद्युत अभियांत्रिकीचे सुवर्णपदक वैभव राजू अतकरी याला आणि रौप्य पदक अंजली गुणसागर गायकवाड या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकीचे रौप्य पदक अमन रमाकांत तामरकरच्या खिशात गेले. वेष्टण तंत्रज्ञानाच्या सुवर्णपदकावर मोहंमद झीशान अली याने तर धातुशास्त्र अभियांत्रिकीच्या सुवर्णपदकावर केतन मोहन पांडे यांनी कब्जा केला. महिती तंत्रज्ञानातील सुवर्ण पदक लिझा लिलाधर बरडे आणि रौप्य पदक दानिया मुबीनूर रेहमान यांच्या खात्यावर जमा झाले. वस्त्रनिर्माण तंत्रज्ञानाचे सुवर्णपदक वैष्णवी मंगेश भलमे हिला तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विराज उत्तम सोमकुवर याला मिळाले. किशोर जगदीश भावसारने स्वयंचलित अभियांत्रिकीचे सुवर्णपदक तर तुषार रामदास दांडेकरने रौप्य पदक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा