शहरातील रहदारीचे ठिकाण असलेल्या मॉल्स, बाजारपेठ आणि चित्रपटगृहाजवळ असलेल्या पार्किंग झंोनमध्ये अनियमिततता असून त्यापायी अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या खाजगी संस्थांना महापालिकेतर्फे पार्किंगचे कंत्राट देण्यात आले आहे त्याठिकाणी सर्रास लूट सुरू असून नागरिकांकडून अवाजवी पैसे आकारले जात आहे. ‘बेस्ट सिटी’ पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावत आहे.
२५ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उपराजधानीत मोठय़ा प्रमाणात शॉपिंग मॉल्स, बाजारपेठा आणि चित्रपटगृह असून त्यापैकी अनेक ठिकाणी पाकिर्ंगची सोय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना दिसून येत आहे. सीताबर्डी भागात मोठय़ा प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने, चित्रपगृहे आणि इटरनिटी मॉल्स आहे मात्र त्या या ठिकाणी पार्किंग झोनची व्यवस्थआ मात्र करण्यात आली नाही. व्यापारी प्रतिष्ठानासमोर त्यांची मालकांची आणि कर्मचाऱ्यांची वाहने असतात त्यामुळे सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी वाहने ठेवण्यास अनेक अडचणी येतात. इटरनिटी मॉल्समध्ये
आतमध्ये झगमगाट असला तरी नागरिकांसाठी पाकिँगची व्यवस्था मात्र फारच तोकडी आहे. या ठिकाणी तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली तिथे नागरिकांकडून शुल्क आकारले जाते. मॉल्समध्ये आलेल्या अनेक नागरिकांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जातात मात्र त्यांना रसिद दिली जात नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आहे. मॉल्सच्या बाहेर वाहने ठेवली तर अवैध पार्किंगच्या नावाखाली वाहतूक पोलिस गाडय़ा उचलून नेत असतात. सीतीबर्डी फ्लायओव्हरच्या खाली वाहने ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असताना त्या जागेवर अनेक व्यापारी वाहने ठेवत असतात. बीग बाजार समोरील जागेवर पार्किंग झोन तयार करण्यात आले असून त्या ठिकाणचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले असून पाच ते दहा रुपये त्या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. धंतोली आणि रामदासपेठ भागात मोठय़ा प्रमाणात रुग्णालय असताना त्या ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या जागेवर संबंधीत रुग्णालयांनी अतिक्रमण केले असून केवळ रुग्णालयात आलेले नागरिक वाहने ठेवू शकतात, असा जणू नियम केला आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयाने त्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील अनधिकृत पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण होत असताना प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे.
शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज या मार्गावर मोठय़ा प्रमाणात व्यपारी प्रतिष्ठाने असून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. अवैध पार्किंगचा नागरिकांना या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात फटका बसतो आहे. या परिसरात चित्रपटगृह मात्र त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चांगली नाही. मध्य नागपुरात पार्किंगची मोठी समस्या आहे. बडकस चौक आणि केळीबाग मार्गावर पार्किंग झोन तयार केले आहे मात्र त्या ठिकाणी वाहनांची गर्दी बघता सामान्य नागरिकांना वाहने ठेवण्यास जागा राहत नाही. या भागात सायंकाळच्यावेळी होणारी गर्दी बघता अनेक लोक रस्त्यावर वाहने ठेवतात त्यामुळे वाहतुकीमध्ये अनेकदा अडथळा निर्माण होतो. सक्करदरा, महाल, गोकुळपेठ, सीताबर्डी, नंदनवन, पाचपावली, सदर या भागात मोठय़ा प्रमाणात पार्किंग झोनची व्यवस्था नाही आणि आहे ती नियमाला धरून नाही. शासकीय कार्यालयासमोर ज्यांना पार्किंगचे कंत्राट देण्यात आहे त्यांच्या अरेरावीचा सामना नागरिकांना करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार्किंगसाठी जागा नाही त्यामुळे अनेकदा अवैध पार्किंगचा नागरिकांना फटका बसतो.
या संदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे आर.एस भुते यांनी सांगितले, पार्किंग झोनसाठी महापालिकेने काही जागा निश्चित केल्या असून त्याचे कंत्राट काही खाजगी संस्थआना देण्यात आले आहे. त्या ठिकाणी नियमानुसार पार्किंग सांभाळले जात नसेल आणि नागरिकांच्या त्या संदर्भात तक्रारी असतील तर त्याची दखल घेण्यात येईल.
पार्किंग झोनचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी केला जात असेल तर अशा कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल असेही भुते यांनी सांगितले.

Story img Loader