अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कारांच्या आणि शारीरिक अत्याचारांच्या तीन घटनांनी जिल्हा हादरला आहे.
आर्णीतील सायराबाई लेआऊटमधील प्रदीप देशमुख नावाच्या ४५ वर्षीय तरुणाने परिसरातील एका ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली आहे. चॉकलेट, बिस्कीट, पेपरिमट देण्याच्या निमित्ताने आरोपी प्रदीप हा मुलीला नेहमी सायकलवर बसून फिरायला नेत असे. रविवारी त्याने असेच या मुलीला सायकलवरून गावाबाहेर नेले आणि झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीला पकडून लोकांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आर्णीचे ठाणेदार गिरीश बोबडे यांनी त्याला अटक केली आहे.
दुसऱ्या एका घटनेत ९ वर्षीय मुलीसोबत अनसíगक कृत्य करणाऱ्या संदीप कांबळे नावाच्या तरुणाला यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी यवतमाळ तालुक्यातील रुई (वाई) येथे घडली. आरोपी संदीप फरार झाला होता, मात्र यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.ए. गायगोले यांनी त्याला धामणगाव रेल्वेस्थानकावर अटक केली. तिसऱ्या घटनेत जिल्हा परिषद शाळेतील १२ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील संभाषण करून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुसद तालुक्यातील धनसड येथे ही घटना घडली.