शहरासह जिल्हय़ातील तुळजापूर, मुरूम, लोहारा परिसरात सोमवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास जमिनीखालून मोठा आवाज झाल्याने घबराट निर्माण झाली. हा जिल्हा भूकंपप्रवण मानला जात असल्याने या झालेल्या आवाजामुळे नागरिक भयभीत झाले. भूगर्भातून आवाज झाल्याने भूकंप झाल्याची अफवा होती. लातूर येथे भूकंपमापन यंत्रावर तशी कोणतीही नोंद नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडय़ात विविध ठिकाणी असे आवाज ऐकावयास आल्याचे वृत्त आहे. जिल्हय़ात पाण्याची पातळी खोल गेल्याने सुमारे ८०० फुटांपर्यंत विंधन विहिरी घेतल्या जातात. त्यामुळे जमिनीत असणारा वायू जोराने बाहेर येतो. त्यामुळे आवाज येऊ शकतात, असे अधिकारी सांगतात.
सोमवारच्या प्रकारानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे पथक या परिसरात पाठविले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा