नशीब, फलज्योतिष्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. लोकांना मूर्ख बनवून पोट भरण्याचे ठरावीक लोकांचे ते साधन आहे.अंधश्रद्धा, अज्ञानामुळे लोक फसतात, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
ते स्थानिक सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित कार्यक्रमातबोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दि भंडारा अर्वन को-आप. बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत वैरागडे यांनी केले. अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते.
 प्रमुख    उपस्थितीत    उमेश    चौबे,    वसंत  लाखे, मदन बांडेबुचे, गोविंद चरडे, डॉ. प्रदीप मेघरे, डॉ. मधुकर रंगारी आदी उपस्थित होते.
 चमत्काराबद्दल बोलताना ते म्हणाले, चमत्कार घडवण्याचे सामथ्र्य कुणातही नाही. भारतात समस्यांकडे तोंड वळवून नशिबाला दोष दिला जातो. ज्योतिष व नशीब या केवळ हास्यास्पद गोष्टी आहेत. काही गोष्टी केवळ योगायोगाने घडतात त्याला नशीब नाव दिले जाते. पुढे अनेक उदाहरणे देत ते म्हणाले, लोकांनी नशीब किंवा फलज्योतिषाच्या नावाने फसू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा