* चंद्रपूरच्या आदित्य कोहळे याला एन.डी.ए.चे रौप्यपदक

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला फक्त त्या मागे जावे लागते. आयुष्यात असे काही क्षण येतात की तुम्हाला पुढे जाण्यास अडचणी निर्माण होतात. पण आपल्या नशिबावर अवलंबून न राहता कठोर मेहनत करत राहिल्यास तुम्हाला यश निश्चित मिळते. नशीब हे माझ्यासाठी नेहमीच दुय्यम राहिले आहे.
..राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२३ व्या तुकडीत रौप्यपदक मिळवणारा चंद्रपूरचा आदित्य कोहळे सांगत होता. आदित्य मूळचा चंद्रपूरचा असून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे चंद्रपूरलाच झाले. आदित्यचे वडील विलास कोहळे पीडब्ल्यूडी खात्यात नोकरीला आहेत, तर आई सीमा या शिक्षिका आहेत. ‘‘चंद्रपूरला दहावी झाल्यानंतर वडिलांची बदली औरंगाबादला झाली. त्यामुळे माझे पुढील शिक्षण या ठिकाणीच झाले व येथेच एनडीएमध्ये जाण्याची आवड निर्माण झाली. औरंगाबाद येथेच माझा सगळा पाया पक्का झाला. एनडीएमध्ये प्रवेश मिळाला. येथील तीन वर्षे ही मजेत गेली. या ठिकाणी भरपूर शिकण्यासाठी मिळाले. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला त्याच्या पाठीमागे जायचे असते. मी नेहमीच कठोर मेहनत हेच तंत्र वापरले. नशीब हे माझ्यासाठी दुय्यम राहिले आहे. यानंतर मी आर्मीत जाणार आहे. एनडीएमध्ये प्रवेश घेतल्यापासून पदक जिंकायचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले,’’ अशा भावना आदित्य याने व्यक्त केल्या

Story img Loader