नाथे ग्रुपच्या बुक्स डिस्ट्रीब्युटर कंपनीतर्फे २१ डिसेंबर २०१२ ते २१ जानेवारी २०१३ या काळात कंपनीच्या झाशी राणी चौकातील संस्कृती संकुल व मेडिकल चौक स्थित दोन्ही पुस्तक विक्री केंद्रामधून विकल्या जाणाऱ्या पुस्तकांवर सवलत आणि ‘लकी कूपन’ पुरस्कार योजना राबवण्यात आली होती. प्रथम तीन ड्रॉ काढण्यात आले. त्यात प्रथम पुरस्कार ५००१ रुपये विक्रमराज शाहू यांना, द्वितीय पुरस्कार ३००१ रुपये रेणू गालिनवार यांना, तर तृतीय पुरस्कार २००१ रुपये प्रणय चहांदे यांना मिळाला. याशिवाय ५०१ रुपयाचे पंचवीस कूपन प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून काढण्यात आले. या स्पर्धेत सुमारे पंधरा हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. लकी ड्रॉ सोडतीच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून रमेश कुलकर्णी व मुश्ताक शेख यांच्या व्यतिरिक्त नाथे ग्रुपचे अध्यक्ष संजय नाथे आणि महाव्यवस्थापक मंगेश नाथे यांच्यासह लोकसत्ता-इंडियन एक्स्प्रेस समूहाचे वितरण विभागाचे सहव्यवस्थापक गजानन बोबडे, नाथे बुक्सचे व्यवस्थापक सुरेंद्र मासूरकर, रोजगार नोकरी संदर्भचे वितरण व्यवस्थापक दीपक बैस  हजर होते.
‘स्टडी सर्कल’ची भरारी
कोल्हापूरमध्ये १९९०ला एका लहान खोलीमध्ये सुरू झालेल्या ‘स्टडी सर्कल’ या संस्थेला आता वटवृक्षाचे रूप आले असून २२ वर्षांत महाराष्ट्रात तसेच राज्याबाहेरही विस्तार झाला आहे. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे प्र्वतक व निमंत्रक डॉ. आनंद पाटील हे या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस. एम.एस. पदवी प्राप्त करून १९८५ ते ९० दरम्यान वैद्यकीय सेवा केली. त्यांनी १९८८-८९ मध्ये यूपीएससी परीक्षेत ६९ वे स्थान प्राप्त केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची संधी सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास चळवळीची मुहूर्तमेड रोवली. राज्यात स्टडी सर्कलची २५ केंद्रे सुरू आहेत. दिल्लीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. या संस्थेसोबतच त्यांनी ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्टची स्थापना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा