भुईंज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मदन भोसलेंच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी ग्रामविकास पॅनेलला मोठा विजय मिळाला. १६ जागांपैकी १५ जागी घवघवीत यश त्यांनी मिळविले.
वाई तालुक्यातील भुईंज ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंच्या गावात घुसखोरी करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. १६ पैकी फक्त एका जागेवरच त्यांना यश मिळाले.
मदन भोसले यांच्या ग्राम विकास पॅनेलच्या मोहन प्रतापराव भोसले, भैयासाहेब जाधवराव, जिल्हा परिषद सदस्या राजनंदा जाधवराव, सतीश भोसले, गजानन भोसले आदींनी प्रचार केला. निवडणुकीपूर्वीच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे- (कंसात) वॉर्ड क्रमांक १ सावता वॉर्ड- चंद्रदिप संभाजी भोसले (४७३), सीमा प्रदीप कांबळे (४७१) वॉर्ड क्र. २ महालक्ष्मी वॉर्ड मदन शिंदे (४६९), माया भोसले (४४६), धनश्री शेवते (४३४), वॉर्ड क्र ३. हनुमान वॉर्ड – प्रशांत जाधव (६६५), अनुराधा गजानन भोसले (५५९), स्वाती लोखंडे  बिनविरोध. वॉर्ड क्र. ४. पद्मावती वॉर्ड अर्चना भोसले (६२१), नारायण शेडगे (४४३) प्रकाश दुर्गुडे – बिनविरोध, वॉर्ड क्र. ५. भवानी वॉर्ड – शेखर श्रीरंग मोरे (६५१) बाळकृष्ण कोंडीबा कांबळे (६२९) वॉर्ड क्र. ६ मालोबा वॉर्ड – प्रकाश गजानन ननावरे (५०६), इंदू उत्तम खरे (४४९), कविता चंद्रकांत निकम (४९१) या निवडणुकीत धनश्री शेवते या एकमेव उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत पॅनेलमधून विजयी झाल्या.
भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच पद मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने बा. को. कांबळे यांना सरपंच पद मिळण्याची शक्यता आहे. मदन भोसलेंनी ही निवडणूक एकतर्फी जिंकली. या मिरवणुकीकडे परिसराचे लक्ष लागले होते. विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा