मे महिन्यातील शेवटच्या व सलग सुट्टय़ांना, शनिवार-रविवारी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटक आणि वाहतुकीच्या लोंढय़ांनी पॅक झाले.
देश-विदेशातील पर्यटकांची थंड हवेच्या पर्यटन स्थळांची पसंती असलेले पाचगणी महाबळेश्वर उन्हाळी हंगामाबरोबर पावसाळी हंगामासाठीही प्रसिद्ध असतो आणि अनेक वेळा गर्दीचा उच्चांक होतो. या वेळी मे महिन्यातील शनिवार – रविवारी आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांचा आणि गाडय़ांचा प्रचंड मोठा लोंढा या पर्यटन स्थळांवर होता. यामुळे हॉटेल व वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेली. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका दस्तुरखुद्द साताऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. रामस्वामी एन. यांनाही बसला. वेण्णालेक ते महाबळेश्वर हे दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी त्यांना काही तास लागले. वाहतूक नियंत्रित करताना पोलीस यंत्रणेच्याही नाकीनऊ आले. पाचगणी येथे प्रवेश कराच्या वसुलीमुळे दांडेघपर्यंत रांगा लागल्या होत्या.
या दोन दिवसात मोठय़ा संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे पाचगणी महाबळेश्वर शहरासह प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. दोन-दोन तास गाडीत बसूनच काढावे लागले. त्यामुळे शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
 वाहतूक कोंडीत जिल्हाधिकारीही अडकले
शनिवार – रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आपल्या परिवारासह आले होते. शनिवारी दुपारी ते पॉईंट्स पाहण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्यापाठीमागे महसूलचे अधिकारी होते. केटस पाँईंटकडे जाताना अरुंद रस्त्यावर त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हा अनुभव त्यांना दोन्ही दिवस आल्याने जिल्हाधिकारी तरी वाहतूक शिस्तीसाठी काही प्रयत्न करतील अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
 

Royal wedding ceremony of Shri Vitthal Rukmini on occasion of Vasant Panchami in Pandharpur
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Festival of 16 films by German director Wim Wenders
जर्मन दिग्दर्शक विम वेंडर्स यांच्या १६ चित्रपटांचा महोत्सव; या चित्रपटांचे खेळ
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
cr cancelled ac local trains due to b due to malfunction मध्य रेल्वेची वातानुकूलित लोकल ऐनवेळी रद्द
मध्य रेल्वेची वातानुकूलित लोकल ऐनवेळी रद्द; पाचपट रक्कम मोजूनही प्रवाशांच्या वाट्याला गर्दीच
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
Stampede breaks out at Maha Kumbh on Mauni Amavasya
Stampede Breaks Out at Maha Kumbh : “महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झालीच नाही, फक्त भाविकांची…”, पोलिसांनी केलं स्पष्ट!
Story img Loader