घराला कडी-कुलूप लावून शेजारी गप्पा मारायला जाणे गृहिणीला चांगलेच महागात पडले. भरदुपारी बंद घरातून चोरटय़ांनी सव्वा लाखाचे दागिने व रोकड लांबविली. शहरातील सदाशिवनगर भागात सोमवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
बालाजी नारायणराव महामुने (वय ५०, एन २, प्लॉट नं. ५९, सदाशिवनगर) यांच्या घरी चोरटय़ांनी भरदिवसा हात साफ केला. महामुने नोकरीनिमित्त घराबाहेर गेले होते, तर त्यांची पत्नी दुपारी घराला कडीकुलूप लावून शेजारी गप्पा मारण्यास म्हणून गेली होती. परंतु तीच संधी साधून चोरटय़ांनी घराचा मागील दरवाजा उघडून आत प्रवेश मिळविला.
बेडरूममधील लोखंडी दरवाजा उचकटून सोन्याचे ४ तोळय़ांचे मंगळसूत्र, सहा ग्रॅमची साखळी, रोख एक हजार रुपये असा १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडत असल्याने दिवसा घर बंद करून बाहेर पडणेही जिकिरीचे होऊ लागल्याचे दिसत आहे. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरोधात मुकुंदवाडी पोलिसात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2012 रोजी प्रकाशित
औरंगाबादेत भरदुपारी सव्वा लाखाची घरफोडी
घराला कडी-कुलूप लावून शेजारी गप्पा मारायला जाणे गृहिणीला चांगलेच महागात पडले. भरदुपारी बंद घरातून चोरटय़ांनी सव्वा लाखाचे दागिने व रोकड लांबविली. शहरातील सदाशिवनगर भागात सोमवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
First published on: 11-09-2012 at 09:23 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra crime crime robbery gold robbery cash robbery